Fake Currency ANI
मुंबई/पुणे

Fake Currency : सावधान! तुमच्या खिशातील २०० रुपयांची नोट नकली? बनावट नोटांचे बंडलच सापडले

मागील काही महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस नोटा आढळून येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News : मागील काही महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस नोटा आढळून येत आहेत. या नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. अशातच, मुंबई पोलिसांनी बनावट नोटा जवळ बाळगून त्या बाजारात वापरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. (Mumbai Crime News)

त्याच्याकडून अंदाजे ६० हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हनीफ शेख वय (३३ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मालवणी पोलिसांनी (Police) ही धडाकेबाज कारवाई केली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या २०० रुपयांच्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी हनीफ शेख हा पेशाने चित्रकार असून तो बनावट नोटा बनवायचा. या नोटांचा वापर तो बाजारात करायचा. आरोपी इतका चालाख होता की तो याची कुणालाही कुणकुण लागू देत नव्हता. मात्र, याची माहिती खबऱ्याला लागली.

खबऱ्याकडून माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपी हनीफ शेख याला अटक केली. त्याच्याकडून २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला. या नोटा ६० हजार रुपये किंमतीच्या असून त्या तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT