मायानगरी मुंबईत तुम्ही भाड्यानं वास्तव्य करत असाल तर ही बातमी
तुमच्यासाठीच आहे... मुंबई पोलिसांच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी एका प्रकरणात
महत्त्वपूर्ण आदेश दिलाय... या आदेशानुसार आता घरमालकांना मोठा दिलासा मिळण्याची
चिन्हे आहेत. सांताक्रूझ पूर्व येथील एका प्रकरणात भाडेकरु घर रिक्त करीत नसल्याचा
अर्ज 16 ऑक्टोबरला दाखल झाला होता. या प्रकरणी तात्काळ सुनावणी घेत भाडेकरुंना घर
रिक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. करार संपल्यानंतरही घराचा ताबा न सोडणाऱ्या
भाडेकरूविरोधात कारवाई करताना मुंबई पोलिसांनी काय आदेश दिलेत ते पाहूयात...
आता भाडेकरु करार संपल्यानंतरही घर रिकामं करत नसेल तर घरमालकाला मुंबईतील 15
पोलीस उपायुक्तांकडे दाद मागता येणार आहे. या पोलीस उपायुक्तांची सक्षम प्राधिकारी
म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. भाडेकराराची मुदत संपल्याच्या तारखेपासून घराचा
ताबा देईपर्यंत मासिक भाड्याच्या दुप्पट नुकसानभरपाईचे आदेशही जारी केलेत.
खरंतर, भाडे नियंत्रण कायद्यानुसार पोलीस उपायुक्तांना सक्षम
प्राधिकाऱ्याचे अधिकार केल्यानंतर हा पहिलाच आदेश आहे. त्यामुळे हजारो घरमालकांना
फायदा होणार आहे. स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या मुंबईत शिक्षणापासून ते नोकरीसाठी
परराज्यातून असंख्य लोक येत असतात. मात्र, लोकांना मुंबईत आपलं हक्कच घर घेणं आता
परवडेना झालं आहे. घरांच्या किंमती गगनाला भिडल्यानं हक्काचं घर घेण्यासाठी अनेक
वर्ष झटत राहावं लागतात. त्यामुळे अनेकजण भाड्याने राहतात. याच पार्श्वभूमीवर,
मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशामुळे घर मालकांना होणाऱ्या आर्थिक नुकसान आणि
कायदेशीर प्रक्रियेच्या कचाट्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.