Mumbai Police Force recruitment Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Police Force recruitment: मुंबई पोलीस दलात कोणतीही कंत्राटी भरती होणार नाही; गृहविभागातील सूत्रांची माहिती

जोवर नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोवरच या कंत्राटी सेवा घेण्यात येणार आहेत, अशी बातमी एका वृत्तपत्राने दिली होती.

साम टिव्ही ब्युरो

सूरज मसुरकर

Mumbai Police Force: आज सकाळपासूनच मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती होणार असल्याची चर्चा सुरू होती. नागरिक यावर संताप व्यक्त करत असतानाच या बाबात मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

मुंबई पोलीस दलातील भरती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची होणार असल्याचे धादांत खोटे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले. पोलिस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, अशी माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे.

गेल्या काळात पोलिस भरती न झाल्याने आणि गेल्या पोलिस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलिस जिल्हा बदल्यांसाठी सोडल्याने मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. पोलिस शिपायांची सुमारे 10 हजार पदे रिक्त आहेत.

ही रिक्त पदे भरण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते मिळण्यास विलंब लागतो. पोलिस भरती करुन नियमित पोलिस सेवेत दाखल होईस्तोवर मुंबईची कायदा-सुव्यवस्था वार्‍यावर सोडू शकत नाही. त्यामुळे मुंबई पोलिस दलाने शासनाच्याच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ तुर्तास वापरण्याचे ठरविले. जोवर नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोवरच या कंत्राटी सेवा घेण्यात येणार आहेत, अशी बातमी एका वृत्तपत्राने दिली होती.

गह विभागाने या कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्याचं देखील त्यात म्हटलं होतं. मात्र आता ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आलीये. गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी या बाबात माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT