मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. (Parambir Singh Met CM Eknath Shinde)
परमबीर सिंह यांनी अचानक शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप केले होते.
परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकंच नाही तर, या प्रकरणात देशमुखांना जेलही झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंह यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आलंय.
दरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आजच सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणारे परमबीर सिंह हे दुसरे पोलिस अधिकारी आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांचं पुन्हा पोलीस दालात पुनरागमन होतं का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.