uddhav Thackeray Aditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray Group BMC Morcha : ठाकरे गटाच्या मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण पोलिसांनी परवानगीच नाकारली?

Mumbai News : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तर ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांच लक्ष आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली.

मुंबई महापालिकेतील गैरकारभाराबाबत कॅगच्या अहवालानंतर एसआटी चौकशी सुरु आहे. मात्र सध्या मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे.

याकडेच लक्ष वेधण्यासाठी आणि महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व तयारी सुरु केली आहे. तसेच या मोर्चाचा टीझरही पक्षाने रिलीज केला आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांना परवानगीच नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तर ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांच लक्ष आहे.

सध्या मुंबईला कोणी मायबाप नाही. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जवळपास ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. मात्र मुंबईकरांच्या या पैशांची लूट सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा असेल असेही ठाकरे गटाने स्पष्ट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT