Fake CBI Gang Bust 
मुंबई/पुणे

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Fake CBI Gang Busted: मुंबई पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी सीबीआय (CBI) आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून सराफाचे लुटमार करत असे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली आह

Bharat Jadhav

  • सराफा व्यावसायिकाचे अपहरण व लूट करण्यात आली.

  • आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत १३.३० लाखांचा मुद्देमाल लुटला

  • महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक

संजय गडदे, साम प्रतिनिधी

जोगेश्वरी (पूर्व) परिसरात बनावट क्राईम ब्रांच पोलीस असल्याची बतावणी करून एका सुवर्ण व्यावसायिकाचे अपहरण करत पिस्तुलाचा धाक दाखवून १२.५० लाखांची रोकड आणि १० ग्रॅम सोन्याचे तुकडे असा एकूण १३.३० लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.

२० जून २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तक्रारदार खोकन निताई मंडळ हे दुकान बंद करून रोकड व सोन्याचे तुकडे घेऊन जात असताना तीन जणांनी स्वतःला क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचे सांगत त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. गाडीत पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि सोने हिसकावून आरोपी पसार झाले.

घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डम्प डेटा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींचा माग काढत पोलिसांनी कांदिवली, वसई, लोकमान्य टिळक टर्मिनस, उज्जैन आणि हावडा येथे धाड टाकून टोळीतील प्रमुख आरोपींना अटक केली.

या कारवाईत ६.१८ लाख रुपये रोख, १० ग्रॅम सोन्याचे तुकडे, देशी बनावटीचे पिस्तुल, चार जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली कार, बनावट पोलीस ओळखपत्रे आणि बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.

मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम पावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT