Mumbai Police Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई पोलिस आयुक्तांनी राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ केला ट्वीट, म्हणाले...

संजय पांडे यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन पोस्ट केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राणा दाम्पत्याने खार पोलिसांवरती गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. आम्हाला जेलमध्ये पाणी दिले नाही, जातीवाचक बोलले, मला टॉयलेटला जाऊ दिले नाही अशा आशयाचे पत्र खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) याचा अहवाल मागीतला होता. राणा दाम्पत्याच्या या आरोपानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी एक ट्वीट करुन सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय पांडे यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन पोस्ट केले आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याने केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे तपासले जाईल. संजय पांडे यांनी आमदार रवी राणा आणि खासदरा नवनीत राणा यांचा चहा पितानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक देण्यात येत असल्याचे यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान राज्यात हनुमान चालीसावरुन राजकारण तापले आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर शिवसैनिकांनी राणांच्या खारच्या घराबाहेर त्याचबरोबर मातोश्रीसमोर तळ ठोकला. राणा दाम्पत्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची लटकलेली चरबी सांगेल शरीरातली 'ही' कमजोरी

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

SCROLL FOR NEXT