मुंबईतील कथित हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला.
प्राथमिक माहितीनुसार, दोन अभिनेत्री आणि एका महिला मेकअप आर्टिस्टचा या प्रकरणात समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
तपासात एका रात्रीसाठी सुमारे २ लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप
मुंबईतील गिरगाव येथे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात दोन अभिनेत्रींसह एक महिला मेकअप आर्टिस्टचा समावेश आहे. दोन अभिनेत्रीपैकी एक मराठी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरी बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. या प्रकारामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ पसरली आहे. या प्रकरणी अभिनेत्रींकडून एका रात्रीचे २ लाख रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गिरगाव परिसरात एका हॉटेलमध्ये मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट ४ ने कारवाई करत हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायचा पर्दाफाश केला. या व्यवसायात दोन्ही अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दोन्ही अभिनेत्रींचा दोन लाखांत सौदा केला होता. यात एका रात्रीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये घेण्यात आले होते. देहविक्रीचा सौदा झाल्यानंतर आरोपी मेकअप आर्टिस्ट महिलेने दोन्ही अभिनेत्रीं गिरगाव येथील हॉटेलमध्ये घेऊन गेली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी छापा टाकत आरोपी महिलेला अटक करत दोन्ही अभिनेत्रींची सुटका केली.
दुसरीकडे कल्याण पूर्व भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये एक ज्येष्ठ महिला वकील काही गरजू पीडित मुलींना हाताशी धरून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने हा प्रकार उघडकीस आणला असून याप्रकरणी मुख्य सूत्रधार वकील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
याआधी जानेवारी महिन्यात अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या (AIITD) एका पथकाने नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये छापा टाकला होता. यातचालणाऱ्या अवैध वेश्याव्यवसाय टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पथकाने घटनास्थळावरून सात महिलांची सुटका केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.