mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : चिमुकली अंगणात खेळत होती, शेजारी राहणारा आला अन् उचलून घेऊन गेला; अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली!

Mumbai Shivadi News : अंगणात खेळणाऱ्या मुलीवर ३० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील शिवडीच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत ५ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्यानेच ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या शिवडी परिसरात ५ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ५ वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. चिमुरडी अंगणात खेळत असताना तिला उचलून स्वत:च्या घरी नेलं. त्यानंतर या ३० वर्षीय शेजाऱ्याने मुलीवर अत्याचार केला.

या प्रकरणी आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. ५ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चिमुकलीवर अत्याचार, तरुणाला २० वर्षांचा कारावास

नागपुरातील पाच वर्षांच्या चिमुकलीवर शेजारच्या 27 वर्षीय तरुणाला बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को कायद्यान्वये दोषी ठरवलं. या प्रकरणी त्याला वीस वर्षाचा कारावास सुनावला. जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या तरुणाच्या विरोधात 6 एप्रिल 2022 खापरखेडा पोलीस ठाणे अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीच्या मोठ्या भावाला पाच वर्षाची मुलगी होती. त्यासोबत ही पीडित मुलगी खेळायला जात होती. घटनेच्या दिवशी रात्री आरोपीने पीडितेला शेतात नेऊन अत्याचार केला. पीडितेने सगळी हकीकत आईला सांगितल्यानंतर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT