mumbai crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: पैशांचा वाद जीवावर बेतला; सासरच्यांनी केली सुनेची हत्या, परिसरात खळबळ

Mumbai Crime news: मुंबईच्या मालाड भागात सासरच्या सदस्यांनी सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घटना वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मालाड भागात सासरच्या सदस्यांनी सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलीस ठाण्याच्या हड स्कॅटर कॉलनीत काल रात्री सासू, सासरा आणि मेहुण्याने मिळून सुनेची हत्या केल्याची घटना घडली आहे. 10 लाखांच्या व्यवहारातून सून आयेशाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी अकबर सय्यद यांनी मुलगा इरफान आणि सून आयेशा यांना घर बांधण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. सासऱ्याने आपल्या सून आणि मुलाकडे पैशांसाठी तगादा सुरू केला. मात्र पैसे न दिल्याने त्यांच्याशी भांडण व्हायचे. त्यामुळे हा वाद वाढत गेला. आठवडाभरापूर्वीही पैशांवरून वाद सुरू झाला होता.

मात्र, गुरुवारी संध्याकाळी किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि सासू रोकय्या सय्यद आणि तिची मुलगी गौरी सय्यद यांनी सून आयेशाचे केस पकडून तिला जमिनीवर फेकले. त्यामुळे सून जखमी झाली.

तरीही त्याला लाथा-बुक्क्यांनी इतके मारले की त्याचा मृत्यू झाला. मालवणी पोलिसांनी सासरा अकबर सय्यद, सासू रोकय्या सय्यद आणि मेहुणी गौरी सय्यद यांना मालवणी येथून अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयेशाच्या मृत्यूने तिच्या राहत्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT