Mumbai: तृतीयपंथी बनून लोकांना लुटणाऱ्या अट्टल भामट्याला अटक! जयश्री मोरे
मुंबई/पुणे

Mumbai: तृतीयपंथी बनून लोकांना लुटणाऱ्या अट्टल भामट्याला अटक!

तुमच्या घरावर अरिष्ट येणार आहे असे सांगून त्याचे निवारण करण्याच्या बहाण्याने नागरिकांना तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.

जयश्री मोरे

मुंबई : तुमच्या घरावर अरिष्ट येणार आहे असे सांगून त्याचे निवारण करण्याच्या बहाण्याने नागरिकांना तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. जितुभाई जव्हेरभाई परमार (३७) रा.गंजाडीपाडा, वसई असे या अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. मागील वर्षी पंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गारोडिया नगर भागात राहत असलेल्या दाणाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. घराबाहेर काळी फुली मारून त्याने तुमच्यावर घोर संकट आले आहे असे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सांगितले. पाण्याच्या ग्लास मध्ये थोडी मिर्ची आणि मीठ टाकून आणा असे त्याने घरातील सदस्यांना सांगितले.

हे देखील पहा :

त्यानंतर त्याने ते पिऊन टाकून आपले संकट पिऊन टाकले आहे असे सांगितले. त्यानंतर घरातील कुटुंबीयांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एकावर रुमाला मध्ये ठेवण्यास सांगून तो बाहेर चौकात ठेवण्यास सांगितले व परत घेऊन जाण्यास सांगितले असे बोलण्यात गुंतवून हात चालखी करून ते सोने घेऊन पळ काढला होता. या बाबत पटेल कुटुंबाने पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पंतनगर पोलीस या आरोपी चा शोध घेत असताना पोलिसांना सदर आरोपी हा मुलुंड च्या नवघर मध्ये येणार असल्याची माहिती शुक्रवार दि २२ रोजी मिळाली.

पंतनगर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून या अट्टल ठगाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुजरात मधील अंबाझरी पोलीस ठाणे, लिंबायत, गिर्याधर, जुनागड तालुका पोलीस ठाणे, जेतपुर सिटी पोलीस ठाणे, भायावधार पोलीस ठाणे इत्यादी पोलीस ठाण्यात असेच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे आणि पथकाने या आरोपीला शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी तृतीय पंथी बनून नागरिकांना गंडा घालत असला तरी त्याला एक मुलगा असून तो अश्याच प्रकारे गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये फिरून नागरिकांना जादू टोना च्या नावाखाली गंडा घालत असल्याचे समोर आले आहे. सध्या पंतनगर पोलीस या आरोपी ची कसून चौकशी करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT