Saint George Hospital News : Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू, नातेवाईकांचा राडा, राहुल नार्वेकरांकडून २ डॉक्टरांचे निलंबन

Saint George Hospital News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांची बैठक घेतली. त्यानंतर रुग्णालयातील दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे| मुंबई, ता. ८ ऑगस्ट २०२४

मुंबईमधील सेंट जॉर्ज रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिस चव्हाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून या प्रकरणी दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या सेंट जाॅर्ज रूग्णालयात एका कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी म्रुत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुबियांनी केला आहे. रुग्णाला दोन तास बसवून ठेवल्यामुळे व डॉक्टर नसल्यामुळे त्या रुग्णाचा जीव गेला असा आरोप करत रुग्णाचे नातेवाईक तसेच इतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच जोपर्यंत याप्रकरणी कारवाई होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.

याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांची बैठक घेतली. त्यानंतर रुग्णालयातील दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. आज दुपारी या घटनेबाबत ते विधीमंडळात बैठक घेणार आहेत. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी चव्हाण यांच्या डोक्याला एका अपघातात दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वेळेवर उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. ज्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT