Bhandup News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: हृदयद्रावक! खेळता खेळता गटारात पडला, दीड वर्षांच्या चिमुकल्याच मृत्यू

boy died after felling into sewer: भांडुपमध्ये दीड वर्षांचा चिमुकला आपल्या घराशेजारी खेळत होता. त्याठिकाणी गटार खुले होते. खेळता खेळता हा चिमुकला गटारामध्ये पडला.

Priya More

मयूर राणे, मुंबई

खेळता खेळता गटारामध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या भांडूपमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी भांडूप पोलिस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमध्ये दीड वर्षांचा चिमुकला आपल्या घराशेजारी खेळत होता. त्याठिकाणी गटार खुले होते. खेळता खेळता हा चिमुकला गटारामध्ये पडला. गटारामध्ये जास्त पाणी असल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगा घराबाहेर खेळत असल्यामुळे त्याचे कुटुंबीय निर्धास्त होते. पण बराच वेळ झाला चिमुकला दिसत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी सगळीकडे चिमुकल्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. शेवटची गटारामध्ये त्याचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र याला पालिका जबाबदार असून या अगोदर वारंवार तक्रार करून देखील गटार साफ केले गेले नाही. गटार खुले ठेवले असल्याने पालिका याला जबाबदार असल्याचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी आरोप केला आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

SCROLL FOR NEXT