Missing 3-year-old girl met to parents saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : माणुसकी जिवंत आहे! वाट चुकलेल्या 3 वर्षांच्या चिमुकलीला आई-वडिलांपर्यंत पोहोचवले...

Missing 3-year-old girl met to parents : तीन तासांनी आपल्या मुलीची भेट झाल्याने आई-वडिलांचे डोळे पाणावले होते.

Chandrakant Jagtap

>>अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याणमध्ये एका सतर्क दाम्पत्याने मानुसकी जिवंत असल्याचे उदाहरण दाखवून दिले आहे. या दाम्पत्याने कल्याण महात्मा फुले पोलीसांच्या साह्याने वाट चुकलेल्या एका ३ वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवले आहे. यामुळे तब्बल तीन तासांनी आपल्या मुलीची भेट झाल्याने आई-वडिलांचे डोळे पाणावले होते. या आई-वडिलांनी भावूक होऊन पोलीस आणि चिमुकलीला पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पती-पत्नीचे आभार मानले.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रामबाग परिसरात राहणारे ओमकार खात्री आणि त्याचा मित्र कल्याण मुरबाड रोडवर गेस्ट हाऊस जवळ फेरफटका मारत होते. यावेळी तीन वर्षाची एक चिमुकली त्यांना रडताना दिसली. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र या मुलीला कोणीच ओळखत नव्हतं. या चिमुकलीची आई वडिलांची ताटातूट झाली असावी असा संशय या ओमकार यांना आला.

यानंतर त्यांनी लगेच या मुलीला कडेवर घेत थेट महात्मा पोलीस ठाणे घातले. पण ही चिमुकली काही केल्या रडणे थांबत नव्हती. त्यामुळे ओमकारने त्याच्या पत्नीला बोलवून घेतले. ओमकारच्या पत्नीने देखील तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. ओमकार त्याचा मित्र व त्याची पत्नी हे तिघे या मुलीला सांभाळत होते. त्यांनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. (Kalyan News)

यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू झाला. सोशल मीडियावर मुलीचे फोटो व्हायरल करण्यात आले. अवघ्या तीन तासात या मुलीच्या आई-वडिलांना शोधण्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. यानंतर त्यांनी तिला त्यांच्याकडे सुखरुप पोहोचवले. मुलीला पाहताच तिच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले होते. (Mumbai News)

रोशनी असे या चिमुकलीचे नाव असून तिचे आई-वडील कल्याण पश्चिमेकडे मॅक्सी ग्राउंड परिसरात फुगे विकण्याचं काम करतात. फुगे विकत असताना ही मुलगी शेजारीच खेळत होती. मात्र खेळता खेळता ती कल्याण मुरबाड रोडवरील गेस्ट हाऊसपर्यंत पोहोचली. यादरम्यान ओमकार आणि त्याच्या मित्राने तिला पाहिले. त्यांनी लगेच तिला रोशनीला पोलीस ठाण्यात नेले.

महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ या मुलीचे आई-वडिलांचा शोध सुरू केला. याच परिसरात तिचे आई-वडील सापडले. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि सतर्क तरुण ओमकार, त्याची पत्नी आणि मित्रामुळे या मुलीची अवघ्या तीन तासांमध्ये आपल्या आई-वडिलांशी भेट झाली. (Latest Marathi news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT