Dhule Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: ओशिवरामध्ये इमारतीला भीषण आग, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Oshiwara Building Fire: ओशिवरा परिसरात इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. या आगीमध्ये वयोवृद्ध नवरा- बायको आणि त्यांच्या नोकर या तिघांचा मृत्यू झाला.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा परिसरातील इमारतीला मोठी आग लागली. रिया पॅलेस या इमारतीला दहाव्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरामधील रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दहाव्या मजल्यावर दोन वृद्ध राहत होते. त्यांच्या घरामध्ये कामासाठी नोकर ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये तिघांचा देखील मृत्यू झाला.

चंद्रप्रकाश सोनी (७४ वर्षे), ममता सोनी (७४ वर्षे ) आणि त्यांचा नोकर पेलू बेटा ( ४२ वर्षे) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत. आगीमध्ये परिसरामध्ये धुराचे लोट परसरले आहेत. ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT