Goregaon School Student End Life Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: शाळेत गेली पण परत आलीच नाही, विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये केली आत्महत्या; मुंबईतील घटनेने खळबळ

Goregaon School Student End Life: मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. आरे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये विद्यार्थिनीने शाळेमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव पूर्वच्या नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेमध्ये विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या केली. बुटाच्या लेसच्या सहाय्याने गळ्याला दोर लावून मुलीने आत्महत्या केली.

शाळेच्या टॉयलेटमध्ये इतर विद्यार्थी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी शाळेमध्ये धाव घेत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तिच्या पालकांनी देखील काहीच तक्रार केली नाही. आरे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने पाऊस अन् गारपिटीचा दिला इशारा

Kitchen Fridge Direction Tips: वास्तुशास्त्रानुसार,किचनमध्ये फ्रिज कुठे ठेवावा? योग्य दिशा कोणती?

Thursday Horoscope: घाईघाईत निर्णय घेणं टाळा, ५ राशींचे नशिब फळफळणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Accident: काँग्रेसच्या महिला नेत्याच्या कारला भीषण अपघात, वाहनाचा झाला चुराडा

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

SCROLL FOR NEXT