Chembur Gas Cylinder Blast Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईच्या चेंबूर परिसरात मध्यरात्री गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील ७ जण होरपळले

Chembur Cylinder Blast: मुंबईच्या चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसर कंपनाने हादरला.

Satish Daud

Chembur Gas Cylinder Blast Latest News

मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवारी (१ फेब्रुवारी) एक धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसर कंपनाने हादरला. या भयानक घटनेत एकाच कुटुंबातील ७ जण जखमी झाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून एकाच कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai News) चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत एका इमारतीत सुरेश गायकवाड यांचे घर असून ते आपल्या कुटुंबासहित राहतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते घरात झोपले असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण इमारत कंपनाने हादरली. स्फोटानंतर घराला भीषण आग देखील लागली. या आगीत सुरेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. (Latest Marathi News)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

भाईंदरच्या रामदेव पार्क परिसरात सिलिंडरचा स्फोट

भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात एक तरुण गंभाररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर हा प्रकार घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोट झालेल्या घरात इतर तीन व्यावसायिक सिलिंडर होते. सुदैवाने वेळीच आग नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

SCROLL FOR NEXT