Major Surge in Diwali Fire Incidents in Mumbai saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत आगीच्या घटनांनी 2 वर्षांचा विक्रम मोडला; दिवाळीत फटाक्यांमुळे ३३३ ठिकाणी आग

Mumbai Diwali fire incidents : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांमध्ये गेल्या मागील दोन वर्षांचा विक्रम मोडला आहे. मुंबईत तब्बल ३३३ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

Saam TV News

यंदाच्या दिवाळीत मुंबईत आगीच्या घटनांनी गेल्या दोन वर्षांतील विक्रम मोडला आहे. दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईत आगीच्या तब्बल ४९९ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ३३३ घटना फटाक्यांमुळे घडल्याचे प्रकार समोर आले आहे. या दुर्घटनांमध्ये १० जण जखमी झाले, तर मालाड-मालवणी येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे लागलेल्या आगींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये दिवाळीदरम्यान आगीच्या २६२ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ८० घटना फटाक्यांमुळे झाल्या होत्या. २०२५ मध्ये आगीच्या घटनांची संख्या २८९ होती, तर त्यापैकी ११३ घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. मात्र, यंदा फटाक्यांमुळे लागलेल्या आगींची संख्या थेट ३३३ वर पोहोचली आहे.

लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला आगीच्या सर्वाधिक १४२ घटनांची नोंद झाली. त्यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्या. ९ नोव्हेंबरला आगीच्या १६६ घटना घडल्या असून, त्यापैकी १४४ घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. तर १० नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या दिवशी आगीच्या १०२ घटनांची नोंद झाली. त्यापैकी २४ घटना फटाक्यांमुळे झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करण्यात आले आले. उंच इमारतींची छते, बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये रॉकेट पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याचा धोका सर्वाधिक असतो . या बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, कारवाई नेमकी कोणी आणि कशी करायची, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अंमलबजावणीत अपयश आल्याचे चित्र आहे. बंदीनंतर किती ठिकाणी कारवाई झाली, याची आकडेवारीही महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बॉलिवूड कलाकारांच्या माध्यमातून फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, जनजागृती आणि बंदी असूनही फटाक्यांचा वापर कमी झाला नाही. परिणामी, आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाची 18 नोव्हेंबर रोजी होणार निवड

Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा बँकेवर विखे-थोरातांची सत्ता; अध्यक्षपदी सुजय विखे तर उपाध्यक्ष देशमुख

Gulkand Water : सकाळी रिकाम्या पोटी प्या गुलकंदाचं पाणी, फक्त १० दिवसांत दिसतील ५ मोठे बदल

Public Toilet Tips For Women: महिलांनी पब्लिक टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी १० महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

High Court : प्रौढ महिलेला पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT