Mumbai fire brigade recruitment Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai: अग्निशमन दलाच्या भरतीत मोठा गोंधळ, संतापलेल्या तरुणींचे आंदोलन; पाहा नेमकं काय झालं?

महिलांसाठी सुरू असलेल्या या भरतीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाची खुल्या भरतीला सध्या सुरूवात झाली आहे. मुंबईच्या दहिसर येथील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू आहे.  भरतीसाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून तरुणी आल्या होत्या.

मात्र महिलांसाठी सुरू असलेल्या या भरतीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भरतीमध्ये अपात्र ठरवल्याने या तरुणी संतापल्या आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत या तरुणींनी जोरदार घोषणाबाजीही सुरू केली आहे. (Mumbai)

समोर आलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रियेत सहभागी मुलींकडून उंची बरोबर असतानाही नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे.

त्यामुळे या तरुणींचा संतापाचा पारा अनावर झाला. आणि त्यांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना गाडी यांनी देखील पाठिंबा दिला असून भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा गाडी यांनी दिला आहे.

काय आहे तरुणींचा आरोप...

या भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यातून मुली मुंबईमध्ये आल्या आहेत. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप मुलींकडून करण्यात येत आहे.आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आम्ही दोन दिवसांपासून येथे आलो. आमची उंची असतानाही आम्हाला डावलण्यात येत आहे. हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करा. पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT