Mumbai School News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai School News : कांदिवलीत शाळेत अजान लावण्याचा प्रयत्न, पालक-शिवसैनिकांच्या संतापानंतर शाळेचा मोठा निर्णय

Mumbai News : कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News : यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोनच दिवस झाले. मात्र शाळांमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. काल वाशी येथील एका शाळेत 'जय श्रीराम'च्या घोषणांवरुन वाद निर्माण झाला होता. तर आज कांदिवलीतील एका शाळेत अजानवरुन वाद निर्माण झाला आहे.

कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर अजान वाजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. (Crime News)

पालक आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेत जात याबाबत शाळेला जाब विचारला आहे. या संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

पालकांनी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात जात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पालकांच्या विरोधानंतर शाळेने माफी देखील मागितली आहे.

आम्ही सर्व धर्मियांच्या प्रार्थना लावतो असं स्पष्टीकरण देखील शाळेनं दिलं आहे. मात्र पालक आणि शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर कांदिवलीच्या कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Masala Pav : गरमागरम चहा अन् चटपटीत चीजी मसाला पाव, संध्याकाळच्या नाश्त्याचा परफेक्ट बेत

Maharashtra Live News Update: - परभणीच्या राणीसावरगाव ग्राम पंचायत ग्रामसभेत गोधळ हाणामारी

Horoscope Sunday : कुटुंबासाठी तडजोड करावी लागेल, ५ राशींसाठी भाग्याचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास होणार सोयीस्कर; मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

गणेशोत्सवात ३८० स्पेशल ट्रेन; पनवेल-चिपळूण दरम्यान धावणाऱ्या ६ ट्रेन कुठे-कुठे थांबणार? वाचा

SCROLL FOR NEXT