Milk Bag Saam Tv
मुंबई/पुणे

Milk Bag : सावधान! पॅकिंग दूध खरेदी करताय? मग ही बातमी आवर्जून वाचा

तुम्ही जर पॅकिंग दुधाची पिशवी विकत घेत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार : तुम्ही जर पॅकिंग दुधाची पिशवी विकत घेत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, तुमच्या पॅकिंग दुधाच्या पिशवीत झुरळ असू शकते. एका नामांकित कंपनीच्या दुधाच्या पॅकेटमध्ये झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकारबाबत ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवरील कातकरी पाडा येथे राहणारे ज्ञानदेव खरे यांनी नेहमीप्रमाणे दूध (Milk) खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गुड मॉर्निंग कंपनीच्या दुधाची एक लिटरचे पॅकेट दुकानातून विकत घेतले. मात्र, या पॅकेटमध्ये त्यांना काळ्या रंगाचे झुरळ तरंगताना दिसून आले. या प्रकाराची माहिती त्यांनी दूध विक्रेत्या दुकानदाराला दिली.

त्यानंतर त्यांनी दुकानदाराच्या मदतीने दूध वितरित करणाऱ्या एजन्सीशी संपर्क केला. मात्र, या प्रकारावर संबधित दूध वितरक कंपनीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर ज्ञानदेव यांनी या प्रकाराची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परमेश्वर सिंगदवार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे. या प्रोडक्टच्या होणाऱ्या पॅकिंगच्या वेळी हे झुरळ दुधात पडले असावे, अशी शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्तवली आहे. तसेच याबाबत कारवाई सुद्धा करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT