Mumbai News - Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: धक्कादायक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार लंपास; चौघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल ४७.६० लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २३ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. सर्व राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल ४७.६० लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट शिक्के वापरुन, बोगस स्वाक्षऱ्या करुन बनावट धनादेशांच्या मदतीने ही रक्कम काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

एकूण १० धनादेश वापरून ४७.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात फसवणूक, तोतयागिरी आणि बनावटीकरण केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमिता बग, तपन कुमार शि, झिनत खातून आणि प्रमोद सिंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, शासकीय विभागाच्या खात्यातून अशा प्रकारे चोरी होणे गंभीर प्रकार आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्याच महिन्यात शासनाच्या पर्यटन विभातूनही अशा प्रकारे चोरी झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शासनाची खाती सुरक्षित आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Homemade Hair Serum: केसांच्या वाढीसाठी घरीच बनवा खास 'होममेड सीरम', महागड्या प्रोडक्टला करेल फेल

Maharashtra News Live Update: अंजनगाव येथील विनपरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांकडून तिसरी अटक

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तडाखा; जगातील सगळ्यात टॉप गोलंदाजाला चांगलाच धुतला, व्हिडिओ तुफान व्हायरल

Private School Corruption: शिक्षण सोडून शाळा बनताहेत 'दलालीचं केंद्र', शिक्षण माफिया कशी करतात पालकांची लूट?

SCROLL FOR NEXT