Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेस भीषण अपघात; १० जण जखमी

मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई (Mumbai)-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बस पलटी होऊन आणि इको स्पोर्ट गाडीचा टायर फुटून अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी बचाव कार्य करण्यासाठी गेलेल्या डेल्टा फोर्सच्या गाडीला आज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये (Accident) एकुण १० जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये अश्विनी पवार 32, नैतिक पवार 06 दोघे राहणार जोगेश्वरी, संजय माने 40 राहणार नेरूळ, अरुष हाके 10 राहणार मानखुर्द, नंदा नलावडे 21 राहणार दहिसर आणि ज्योती कांबळे 34 राहणार भाइंदर हे जखमी झाले आहेत तर होमगार्ड लक्ष्मण आखाडे वय 30, पोलीस शिपाई चौहान, होमगार्ड दिपेश हातनोलकर 26, डेल्टा फोर्स जीप चालक गुलाब नलावडे वय 37 अशी मदत कार्य करताना जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हा अपघात (Accident) मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर झाला. सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोष

धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT