Police investigate the NESCO music concert venue in Goregaon after two youths died due to suspected drug overdose. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Concert : मुंबईत 'उडता पंजाब', म्युझिक कॉन्सर्टमध्ये इतकं ड्रग्ज आलं कुठून?

NESCO Concert Horror: हाय प्रोफाईल म्युझिक कॉन्सर्ट आता ड्रग्ज पार्टी झालीय... काऱण मुंबईत ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुणांचा मृत्यू झालाय. म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं काय झालं? तरुणांना ड्रग्ज कोणी पुरवले ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

गोरेगावचं नेस्को सेंटर...11 एप्रिलची रात्र...हजारो जेन झी म्युझिक कॉन्सर्टवर थिरकण्यासाठी एकत्र जमले.... मात्र त्याचं कॉन्सर्टला ड्रग्ज माफियांनी घेरल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालयं..... नेस्कोच्या या हाय प्रोफाइल कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांना कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर उघड झालं नशेखोरीच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचं काळं सत्य..

नेस्को सेंटरमध्ये इटलीचा टेक्नो 9 टाईम 9 हा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता...या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता...त्यात कॉन्सर्टदरम्यान तीन जणांना अस्वस्थ वाटू लागलं...त्यातील 2 कॉलेजवयीन विद्यार्थ्यांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय..यात एक तरूणी आहे. कॉन्सर्टला येण्याआधी दोन्ही तरुणांनी कॅबमध्ये एक्सटसी ड्रग्जचं सेवन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या कॉन्सर्टमध्ये 80 टक्के तरुण ड्रग्जच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय...

दरम्यान मृत तरुणांनी कल्याण परिसरातून ड्रग्ज विकत घेतल्याचंही समोर आलयं...मात्र नेस्कोसारख्या हाय-प्रोफाइल ठिकाणी ड्रग्स पोहोचलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच 9 टाईम 9 कॉन्सर्टदरम्यान सुरक्षेचाही कसा फज्जा उडालाय...हे पाहा...सुरेक्षासाठी बसवलेले मेटल डिटेक्टर फक्त नावापुरतेच होते... कार्यक्रमाआधी बॅरिकेड्सवरून तरुणांनी उड्या मारून कॉन्सर्टमध्ये प्रवेश केल्याचंही समोर आलं...दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून 6 जणांना अटक केलीय...

कॉन्सर्टचा आयोजक विहान उर्फ आकाश समाल, नेस्को इव्हेंटच्या व्यवस्थापनाशी संबंधित सनी विनोद जैन, सुरक्षाविभागातील बालकृष्णन कुरुप आणि ड्रग्ज पुरवठा करणारा आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आलीय. तसचं प्रतीक पांडे, रौनक खंडेलवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलयं... दरम्यान मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या या कार्यक्रमाची परवानगी उत्पादन शुल्क विभागाकडून आणि पोलिसांकडून घेण्यात आली होती का? याचा तपास आता सुरु आहे.मा.याप्रकरणी आता मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी कारवाईचे आदेश दिलेत...पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत..कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या आनंद पटेलनं ड्रग्स कोणाकडून आणले? यामागे एखादे मोठे रॅकेट आहे का? याचा तपास आता वनराई पोलीस करत आहेत.महत्वाची बाब म्हणजे या कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही याच शो चा खेळ मुबंईत झाला.. म्युझिक आणि डान्सच्या नावाखाली चालणारा हा मृत्यूचा खेळ कधी थांबणार? विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी 'एमडीएम'च्या गोळ्या येतातच कशा? हा प्रश्न आज प्रत्येक पालकाला सतावतोय. नेस्कोमधील या घटनेने मुंबईच्या सुरक्षिततेचे आणि ड्रग्सविरोधी मोहिमेचे दावे फोल ठरवलेत, एवढं मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधांच्या नफेखोरीतून रुग्णांच्या लुटीचं रॅकेट, 'साम इन्व्हेस्टिगेशन'मध्ये लुटारूंचा पर्दाफाश

Mumbai: वरळीत आंबेडकर अनुयायी अन् पोलिस आमने-सामने, डीजे बंदीच्या विरोधात आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांच्या पगारात होणार वाढ; प्रेमसंबंधही राहतील चांगले; वाचा राशिभविष्य

Crime: महिला डॉक्टरवर बलात्कार, पिझ्झामध्ये गुंगीचे औषध मिसळलं नंतर...

SCROLL FOR NEXT