26-Year-Old Killed In Horrific Crash On Mumbai Nashik Highway saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-नाशिक महामार्गावर थरारक अपघात! 26 वर्षीय तरुण जागीच ठार, चालक कारमध्येच अडकला

26-Year-Old Killed In Horrific Crash On Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्याजवळ भीषण अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी. चालक कारमध्ये अडकला होता.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्याजवळ मंगळवारी पहाटे एका भीषण अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वागळे इस्टेट येथील 'अशार आयटी पार्क'मध्ये काम संपवून डोंबिवलीला घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या महितीनुसार, मंगळवारी (14 ) पहाटेला 3.55 च्या सुमारास हुंदाई ऑरा कार ( क्रमांक MH 04 MR 0339) मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होती. खारेगाव टोलनाक्याजवळील नायरा पेट्रोलपंप परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार समोर उभ्या असलेल्या अशोक लेलँड ट्रेलर ट्रकला (MH 43 CE 5328) मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चालक कारमध्येच अडकून पडला होता.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी क्रेन आणि रुग्णवाहिकासह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकेलेल चालक दीपक पाटेकर ( 26 वर्षे, रा. वागळे इस्टेट) यांना जवानांनी बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

सुजय पाटील (२० वर्षे, रा. डोंबिवली) प्राथमिक उपचारानंतर त्यांना घणसोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राज चिले (२१ वर्षे) आणि सुगम जयस्वाल (२४ वर्षे) दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्नेहल भूसेकर (२३ वर्षे) किरकोळ जखमी असून त्यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT