Devendra Fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

राज आणि उद्धव एकत्र आले तर काय? CM फडणवीसांनी ४ शब्दात विषय संपवला

Devendra Fadnavis News : महापालिका निवडणुकांची घोषणा होतच मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज आणि उद्धव एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं भाष्य फडणवीसांनी केलं.

Vishal Gangurde

२९ महापालिकांचं बिगुल वाजलं

महापालिका निवडणुकांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

राज्यातील २९ महापालिकांचं बिगुल वाजलं आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. ते पुण्यात बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, 'मला अतिशय आनंद आहे की, १५ जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व महापालिकेचे निवडणूक होणार आहे. गेली अनेक वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या. या निवडणुकीत आमच्या शासनाने केलेल्या कामामुळे आमच्या बाजूने निकाल येईल विश्वास आहे'.

'काही ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल. काही ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढेल. ही मैत्रीपूर्ण लढत असेल. शिवसेना सर्व ठिकाणी आमच्या सोबत लढेल, असेही त्यांनी सांगितले.

'भाजपमध्ये येण्याचा ओघ आहे. पण कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही हे अध्यक्ष ठरवतील. दोन्ही ठाकरे एकत्रित आले नाही आले तरी मुंबईकर आमच्या सोबत येतील. आम्हाला फरक पडणार नाही. पंतप्रधान पदाबाबत आतापर्यंत अनेक नेत्यांना साक्षात्कार होत होते, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

'पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर असेल. आमच्या एकत्रित आल्याने विरोधकांचा फायदा होऊ नये म्हणून आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT