mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून नवा वाद; मुंबई महापालिकेने दिले 'हे' स्पष्टीकरण

मुंबई महापालिकेच्या सी - वॉर्ड कार्यालयाने कबरीच्या सुशोभिकरणावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

Yakub Memon Grave Controversy : १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाॅम्ब स्फोटात सहभागी असलेल्या याकूब मेननला फाशी झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान मध्ये याकूब मेननला दफन केले. त्याच्या थडग्यावर विद्युत रोषणाई व सौंदर्यीकरण केले. मात्र बडा कब्रिस्तान ही खाजगी ट्रस्टची जागा असून पालिकेचा या जागेशी संबंध नाही. मुंबई महापालिका (BMC) फक्त मृत्यू दाखला देण्याचे काम करते, असे पालिकेच्या सी - वॉर्ड कार्यालयाने कबरीच्या सुशोभिकरणावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईत १९९३ मध्ये सिरियल बाॅम्ब स्फोट घडवण्यात आले होते. डी गॅगचा मुख्य दाऊद इब्राहिम याच्या सांगण्यावरुन याकूब मेनन याने बाॅम्ब स्फोट घडवून आणल्याने मेनन याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. मेननचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. कुटुंबीयांनी मरीन लाईन्स येथील खाजगी ट्रस्टच्या मालकीची बडा कब्रिस्तानमध्ये याकूब मेनन याला दफन केले. त्यानंतर याकूब मेनन याच्या थडग्यावर विद्युत रोषणाई व सौंदर्यीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून राजकीय वातावरण पेटले आहे.

दरम्यान, ही जागा खाजगी ट्रस्टची असून पालिकेचा संबंध नाही. मुंबई महानगरपालिका फक्त दफन करण्यासाठीची परवानगी देते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची परवानगी देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे स्पष्टीकरण पालिकेच्या सी - वॉर्डचे सहायक आयुक्त किशोर येरमे यांनी दिले आहे.

कोण आहे याकूब मेमन?

याकूब मेमन हा मुंबईतील ९३ बॉम्बस्फोटांचा दोषी आहे. ज्याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याकूब हा एकमेव दोषी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याच याकुबच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमरवरी दगडापासून बनवलेल्या या कबरीवर एलईडी दिवे लावण्यात आले होते. तसेच इथे २४ तास पहारा असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

SCROLL FOR NEXT