Mumbai MHADA News Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Mumbai MHADA News : मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांच्या भाडे प्रकरणात तब्बल १२१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांच्या भाडे प्रकरणात १२१ कोटींचा घोटाळा उघड

  • अनेक विकसक कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप

  • खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

  • अद्याप कोणालाही अटक झालेली नाही

संजय गडदे, मुंबई

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण गाळ्यांच्या भाडे प्रकरणात तब्बल १२१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेरवाडी पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 420 अंतर्गत गुन्हा क्रमांक 115/2026 (आर्थिक गुन्हे विभाग गु.क्र. 40/2026) नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहन रावसाहेब बोबडे (उपमुख्य अधिकारी, संक्रमण गाळे, म्हाडा) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सन १९९६ ते २०२१ या कालावधीत संबंधित विकासकांना म्हाडामार्फत संक्रमण गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. सुरुवातीला काही कालावधीपर्यंत भाडे भरून विश्वास संपादन करण्यात आला.

मात्र त्यानंतर करारातील अटींचे उल्लंघन करून भाडे न भरता म्हाडाची १२१,००,५३,१०५ रुपये इतकी फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा गुन्हा १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता नोंद करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारीनुसार, मे 9 एम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., मे नाखवा अँड जसोल डेव्हलपर्स एलएलपी, प्रदीप गोरा गांधी, जे. के. बिल्डर्स, अलहम्द डेव्हलपर्स, वर्धमान डेव्हलपर्स, उदिती प्रिमायसेस प्रा. लि., संघवी प्रीमायसेस प्रा. लि., आर. आर. बिल्डर्स, हरे कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT