mumbai local train,  Mumbai Mega Block News In Marathi, Mumbai news
mumbai local train, Mumbai Mega Block News In Marathi, Mumbai news Saam Tv
मुंबई/पुणे

चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत 'या' तारखांना असणार मेगाब्लॉक

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) मांटुगा आणि भायखळा दरम्यान इन्फ्रा कामासाठी रात्रीचे विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. रेल्वे क्रेन वापरून दादर स्थानकावर (किमी 8/15-16) फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स लाँच करण्यासाठी माटुंगा आणि भायखळा दरम्यान रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी हा मेगाब्लॉक (Mega Block) कालावधित हे काम करण्यात येणार आहे. ( Mumbai Mega Block News In Marathi )

ब्लॉक कालावधित १७ जून आणि १८ जून रोजी ००.४० ते ०५.४० वाजेपर्यंत मांटुगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर वळविण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबतील.

इंद्रायणी एक्स्प्रेस

डाउन ट्रेन क्रमांक 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवली जाईल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दादर येथे दोनदा थांबतील.

जन शताब्दी एक्स्प्रेस

दिनांक १८ जून रोजी गाडी क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबतील. डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT