Mega Block  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai local update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

Mumbai local Mega Block News : रविनारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Mumbai local train update: मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून, ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आलेय. (MEGA BLOCK November 10, 2024)

माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्याच्या पुढे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील व माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येऊन गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.

अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल- कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे वरील स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT