uddhav thackeray and devendra fadnavis News Saam tv
मुंबई/पुणे

BMC Mayor Election: सर्वात मोठी बातमी! मुंबई महापौरपदावरून ठाकरे-भाजपात बोलणी, राजकीय वर्तुळात चर्चा

Mumbai Mayor election news : मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray and BJP talks over Mumbai Mayor post : मुंबई महापौरपदासाठी उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावीच लागणार आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्षांच्या महापौर पदासाठी भाजपकडे हट्ट धरला होता. त्यातच आता ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे मुंबईच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट आलाय. भाजपला सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबई आणि राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसवेक गैरहजर राहणार असल्याचं रणनीतीमध्ये ठरवण्यात आल्याचेही बोलले जातेय. शिंदे अन् भाजप यांच्यात बोलणी सुरू असतानाच मुंबई महापौर पदावरून मोठा राजकीय ट्विस्ट आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करत असल्यास, ठाकरे गट भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहणार असल्याचे सूत्रांची सांगितले.

२०१७ महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचा महापौर व्हावा, त्यासाठी भाजपने माघार घेतली होती. तीच रणनिती आताही असल्याची राजकीय चर्चा आहे. २०१७ ची परतफेड ठाकरे पुन्हा करणार का? अशी राजकीय चर्चा सध्या जोर धरत आहे. मुंबई महापालिकेतील बहुमत सध्या महायुतीच्या पारड्यात आहे. मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय. मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेनेही मोठी मजल मारली आहे. पण शिंदेंनी अडीच वर्षांची मागणी करत मुंबई महापालिका निवडणुकीत ट्विस्ट आणला होता. आता शिंदे अन् भाजप यांच्यात बोलणी सुरू झाल्याने शिंदेंची मात्र कोंडी झाल्याची स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Bhawan: मुंबईत तयार होणार बिहार भवन, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटींचा खर्च; फायदा नेमका कुणाला होणार?

Maharashtra Live News Update: चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख 4 हजार रुपये; ग्राहकांच्या खिशाला फटका

High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Pune Satara Highway: पुणे सातारा प्रवास सुसाट होणार! ४५ मिनिटे वाचणार; सरकारचा मास्टरप्लान

ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांनी डाव टाकला, जिल्हा परिषदेसाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT