mumbai road accident  representative image
मुंबई/पुणे

मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात, ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

marine drive accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघाताची घटना घडलीये. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय.

Vishal Gangurde

मरीन ड्राइव्हवर भीषण अपघाताचा थरार

अपघातात तिघांचा मृत्यू

अपघात प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

मुंबईतील मरीन ड्राइव्हवर आज सोमवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मरीन ड्राइव्ह परिसरात तीन दुचाकींचा अपघात झाला. गिरगाव चौपाटीजवळ हा भीषण अपघात झालाय. या भीषण दुर्घटनेत ज्येष्ठ नागरिकासह तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईतील मरीन ड्राइव्हवर आज सोमवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मरीन ड्राइव्ह परिसरात तीन दुचाकींचा अपघात झाला. गिरगाव चौपाटीजवळ हा भीषण अपघात झालाय. या भीषण दुर्घटनेत ज्येष्ठ नागरिकासह तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आज सोमवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे. अपघातात स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कुटी अशा तीन दुचाकी एकमेकांना धडकल्या. या वाहनांची एकमेकांना भीषण धडक झाली. तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं. अपघातात तिन्ही जण दगावले आहेत . या अपघातात ६०-६५ वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. तर तरुण आणि तरुणी देखील अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत.

जालन्यात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू , एक जण गंभीर जखमी...

जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर हा काल रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात नळणी येथील सुभाष साठे, विकास साठे यांचा मृत्यू झाला आहे. तर बरंजळा साबळे येथील अनिल बोराडे या तरुणाचा मृत्यू झालाय. तर समाधान कोरके हा तरुण गंभीर जखमी झालाय. जिल्ह्यातील वाढत्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्राथमिक पावले उचलण्याचे आवाहन नागरिकांकडून केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT