Manatralaya VIDEO 
मुंबई/पुणे

Manatralaya: मंत्रालयात खळबळ! फेऱ्या मारून कंटाळला, ५ व्या मजल्याच्या सज्जावर बसला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला केलं रेस्क्यू, VIDEO

Manatralaya VIDEO : वारंवार फेऱ्या मारुनही काम होत नसल्यानं कंटाळलेल्या व्यक्तीने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

मंत्रालयाच्या वारंवार फेऱ्या मारूनही काम होत नसल्यानं कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय. या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलंय.

मंत्रालयात अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT