Viral Video Saamtv
मुंबई/पुणे

Viral Video: लोकलमध्ये फॅशनचा जलवा! स्कर्ट घालून तरुणाची एन्ट्री, लोक बघतच राहिले; पाहा VIDEO

Train Viral Video: काय हा आत्मविश्वास म्हणत नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Gangappa Pujari

Mumbai Local Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी आश्चर्याचा धक्का देणारे तर कधी भितीदायक व्हिडिओंवर नेटकरीही जोरदार प्रतिक्रिया देत असतात. पण सध्या एका व्हायरल व्हिडिओने (Viral Video) नेटकऱ्यांचेही डोळे विस्फारले आहेत. हा व्हिडिओ ट्रेनमधील असल्याचे दिसत असून एक तरुण चक्क स्कर्ट घालून कॅटवॉक करताना दिसत आहे.

आतापर्यंत आपण नेहमी फक्त मुलींनाच स्कर्टमध्ये परिधान करताना पाहिले असेल पण कधी एखाद्या पुरुषाला फॅन्सी स्कर्टमध्ये पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मिडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक तरुण स्कर्ट घालून लोकलमध्ये फिरताना दिसत आहे. हे सर्व पाहून प्रवासी देखील गोंधळात पडलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल (Mumbai Local) ट्रेनमधील आहे. व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळत आहेत आणि अनेक संमिश्र प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहे.

कोण आहे हा तरुण....

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती शिवम भारद्वाज आहे.तो एक फॅशन ब्लॉगर आहे, जो त्याच्या इन्स्टाग्रामवर फॅशनशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतो. तो उत्कृष्ट मेकअप व्हिडिओ शेअर करतो. शिवमचे सोशल मीडियावर ‘द गाय इन अ स्कर्ट’ नावाने अकाउंट आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिवम चालत्या ट्रेनमध्ये स्कर्ट घालून कॅटवॉक करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि काळ्या रंगाचा सनग्लासेस घातला आहे. मुलींसारखे लांब केस त्याने मोकळे सोडले आहेत आणि मुलींप्रमाणे मेकअप देखील केला आहे. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आ वासून शिवमकडे कॅटवॉक करताना आश्चर्याने पाहात आहे. काही लोक हे दृश्य त्यांच्या फोनमध्येही शुट करत आहेत. (Latest Marathi News)

व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक आले आहेत. विशेष म्हणजे लोक शिवमची तारिफ करतात. या प्रतिभावान फॅशन ब्लॉगरसाठी जीवन नेहमीच खडतर राहिले आहे. महिलांचे कपडे घालत असल्यामुळे त्याला घरातून बाहेर काढले होते. मुंबईत राहण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT