Mumbai Rain Local Trains Updates Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईत पहाटेपासूनच तुफान पाऊस, तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai Rain Local Trains Updates : बईसह उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय.

Satish Daud

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर पकडला. मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील (Mumbai Local Train) लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे बदलापूर, ठाणे आणि दादर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने भल्यापहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.

हार्बर मार्गावरील गाड्याही १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु असल्याची माहिती आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्या देखील १० ते १५ मिनिटे उशिराने स्थानकावर येत आहेत. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे ( Mumbai Rain Alert) अंधेरी सब-वे पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

परिणामी पूर्व आणि पश्चिम भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईतील अंधेरी, दादर, परेल, लालबाग, हिंदमाता, चर्चगेट, परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शहरासह उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागात रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

SCROLL FOR NEXT