Local Train Disruption Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वे विस्कळीत, बदलापूरजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train Disruption: मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही मालगाडी कर्जतच्या दिशेने जात होती.

Priya More

मयूरेश कडव, बदलापूर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कर्जत आणि मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे. लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. मालगाडी कर्जतच्या दिशेने जात असताना इंजिनमध्ये बिघाड झाला. अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली. पण याचा फटका लोकल वाहतुकीला बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि मुंबईच्या दिशेकडील लोकल वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिराने सुरू आहे. सकाळी ११ च्या सुमारास कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मालगाडी बलदापूर रेल्वे स्थानकावरच थांबून होती.

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला बसला. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बदलापूरसह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेला कामाला येणाऱ्याचे हाल होत आहे. थोड्या वेळापूर्वीच ही मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT