saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; 300 लोकल गाड्या रद्द

Mumbai Local Train: जम्बो ब्लॉकच्या कामामुळे पश्चिम रेल्वेने ३०० लोकल ट्रेन्स रद्द केल्या. यामुळे मुंबईतील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

Bharat Jadhav

  • पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक लागू

  • 300 लोकल गाड्या रद्द

  • कांदिवली-बोरिवली मार्गावर मोठा परिणाम

संजय गडदे, साम प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेकडून ब्रिजच्या री-गर्डरिंग कामासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 300 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांदिवली, मालाड, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना तासन्तास प्लॅटफॉर्मवर थांबावे लागले.

या जम्बो ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्याचे मार्ग बदलण्यात आलेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर देखभाल काम सुरू असल्यामुळे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. विरार लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून तर चर्चगेट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सोडण्यात येत आहे. तर अनेक लोकल गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवल्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT