Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; मुलुंड, ठाणे अन् कांजूरमार्ग परिसरात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईकरांचे हाल

Mumbai local train update today : मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि ठाणे परिसरातील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Namdeo Kumbhar

आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंड ते ठाणे दरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद गाड्यांची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

नेमकी काय घडली घटना?

आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कांजूरमार्ग (KJRD) स्थानकादरम्यान अचानक सर्व मार्गांवरील सिग्नल बंद पडले (ब्लँक झाले). विक्रोळी ते भांडुप दरम्यान धीम्या आणि जलद मार्गांसह ५ व्या व ६ व्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. ऐन गर्दीच्या वेळीच मुख्य लाईनवरील सिग्नल बंद पडल्याने रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवाव्या लागल्या.

रेल्वे प्रशासनाची तातडीची उपाययोजना

रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा मोठा खोळंबा होत आहे. बिघाड लक्षात येताच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 'मॅन्युअल' (मॅन्युअली ए-बोर्ड ऑथॉरिटी आणि 'TD 912' प्राधिकरणाद्वारे) गाड्या चालवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.

विक्रोळी ते भांडुप दरम्यान 'ॲब्सोल्यूट ब्लॉक वर्किंग' लागू करून गाड्या अत्यंत धिम्या गतीने आणि सुरक्षित अंतरावर पुढे सोडल्या जात आहेत.

बिघाडानंतर डाऊन लोकल लाईन्सवरून 'के-३९' (K39) आणि डाऊन थ्रू लाईन्सवरून 'बीएल-११' (BL11) या गाड्यांना नियमांनुसार हळूहळू पुढे रवाना करण्यात आले.

प्रवाशांचे प्रचंड हाल

सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्यामुळे गाड्या १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली असून कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, रेल्वेचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक पूर्णपणे कधी पूर्ववत होईल, याबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून येणे अजून बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर– राज ठाकरे

Vastu Tips : किचनच्या भिंतींसाठी कोणता रंग शुभ? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार कोणता रंग योग्य? वाढेल सकारात्मक उर्जा

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दिवाळीपूर्वी DA वाढणार? जुलैच्या महागाई भत्त्याबाबत मोठी अपडेट

Sanjay Raut: 500 कोटी कोणी दिले आणि कुठे गेले? संजय राऊतांनी अमित शाहांना लिहिलं पत्र, थेट ED ची मागणी

ATM Safety Tips: एटीएममधून पैसे काढताना चुकूनही करू नका 'या' 5 चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT