Mumbai Local Train Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: तिन्ही मार्गांवर रेल्वे सेवा विस्कळीत; पावसामुळे चाकरमानी रडकुंडीला

Mumbai Local Train Late:पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्काळीत झाली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Rain Local Train News: राज्यात आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे मुंबईकरांची पुरती दाणादाण झालीये. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळपासूनच चाकरमान्यांचे हाल होत आहेत. (Latest Local Train News)

मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच रेल्वे (Local Train) सेवेवर फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा उशिराने आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनीचे उशिराने सुरू आहे. तर मध्य रेल्वे १२ ते १५ मिनीटे उशिरा आहे. यासह हर्बल रेल्वे १५ ते २० मिनीटे उशिराने सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) पडला असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धामणगाव तालुक्यात संत्रीच्या बागांना तालावाचे स्वरूप आल्याने संत्राच्या आंबिया बहाराचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे.

मुंबईसह (Mumbai) आजूबाजूच्या परिसराला गुरूवारी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. शुक्रवारी हवामान खात्याने राज्यातील ७ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाण्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने नागरिकांचे हाल होतायत. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना निवाऱ्यासाठी दुसरे ठिकाण शोधावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

SCROLL FOR NEXT