Mumbai Local train Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Mumbai Local Train Mega Block : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

Satish Daud

ऐन नवरात्री उत्सवात मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेने आज म्हणजेच सोमवारी (ता ६) तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद लोकल ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर

हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल /बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल – ठाणे लोकल सेवा देखील बंद राहतील.

मात्र, असं असलं तरी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान, बेलापूर, नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका लोकल सेवा उपलब्ध असेल. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT