Mumbai Local Train Mega Block News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आज रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

Local Train Mega Block News : मुंबईकरांनो, तुम्ही जर रविवारी घराबाहेर पडत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण,मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे

Satish Daud

मुंबईकरांनो, तुम्ही जर रविवारी घराबाहेर पडत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण,मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करणं गरजेचं आहे.

लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं. मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी लोकलचा प्रवास सुखकर ठरतो. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. अशातच लोकलची चाके थांबली तर मुंबईकरांचा मोठा खोळंबा होतो.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक (Local Train Mega Block) असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णत: बंद राहतील.

रविवारी हार्बर मार्ग ब्लॉक

हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी /वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ –गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉकची वेळ आहे. या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT