Mumbai local train mega block on Sunday: Check Central & Harbour line timings and diversions. Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Mumbai Local Train Mega Block : या रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मुंबई लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक असेन. प्रवासापूर्वी ठाणे-कल्याण आणि कुर्ला-टिळकनगर मार्ग, वेळा आणि डायव्हर्शन तपासून घ्या.

Bharat Jadhav

  • रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असणार.

  • ठाणे–कल्याण आणि कुर्ला–टिळकनगर विभाग प्रभावित होणार.

  • ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक राहणार नाही.

  • प्रवाशांना वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचे आवाहन.

मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या 5व्या व 6व्या मुख्य मार्गवर उपनगरी विभागात मेगाब्लॉक ठेवण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर आधी जाहीर केल्याप्रमाणे कुर्ला–टिळकनगर विभागात ट्राफिक ब्लॉक राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाहीये.

ब्लॉक विभाग व वेळ

ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान 5व्या व 6व्या मार्गावर सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत ब्लॉक राहील.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन:

खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील व या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

17611 हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

12134 मंगळूर जंक्शन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

13201 पटना – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्टेड परीचालन

खालील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे व कल्याण दरम्यान डाउन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर गोदान एक्सप्रेस

11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस

16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस.

मेन मार्गावर मेमू (MEMU) सेवांचे शॉर्ट टर्मिनशन/शॉर्ट ओरिजिनेट:

61003 वसई रोड – दिवा मेन मार्गावर मेमू वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणाऱ्या गाडीचे कोपर येथे शॉर्ट टर्मनैट होईल.

61004 दिवा – वसई रोड मेन मार्गावर मेमू कोपर येथून शॉर्ट ओरिजिनेट होईल व कोपर येथून सकाळी 11.45 वाजता सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Tips: थंडीमुळे हात-पाय थरथर कापतात तेव्हा काय करावे?

Symptoms of Liver Cancer: वजन कमी होण्यासोबत हे संकेत दिसेल तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय, शरीरातील बदल ओळखा

Maharashtra Live News Update: नीतीश कुमारांसह २५ मंत्री घेणार शपथ

एकच नंबर! लग्नसराईत सोनं- चांदीच्या दरात घसरण, १ तोळं सोन्याचा आजचा भाव किती?

IB Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ३६५ पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT