Mega block Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Mega Block : मुंबईत रविवारी ५ तासांचा मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Local Train : मुंबईत मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली. मध्य रेल्वेने तब्बल ५ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे.

Vishal Gangurde

मुंबईत मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने रविवारी सकाळी १०.५५ ते ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान १०.५५ ते १५.५५ पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ वाजल्यापासून १५.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. तर विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर स्थानक येथून सकाळी १०.१९ वाजल्यापासून १५.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या, विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबवण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी १६.४० आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ट्रेन सेवा रद्द राहील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी १८.०० या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात. अशा प्रकारचे देखभाल मेगा ब्लॉक्स, इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT