Mumbai Local Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Local: संतापजनक! लोकल डब्यात विकृत व्यक्तीचा प्रताप, भर डब्यात महिलेकडे पाहून अश्लील चाळे

Woman Harassed in Local: लोकलमध्ये एका २६ वर्षीय तरूणीकडे पाहत विकृत तरूणानं अश्लील चाळे केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. छेडछाड, अत्याचार या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ला ते सायन दरम्यान, लोकलमध्ये एका २६ वर्षीय तरूणीकडे पाहत विकृत तरूणानं अश्लील चाळे केले आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबई रेल्वेमध्ये एका तरूणीसोबत धक्कादायक घटना घडली. एका तरूणानं तरूणीकडे पाहून अश्लील चाळे केले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत तरूणानं अश्लील चाळे केल्यामुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विकृत तरूण दिव्यांग डब्यात होता. पीडित महिला लोकलच्या स्पेशल महिला डब्यात होती. दिव्यांग डब्यात असणाऱ्या तरूणानं महिलांच्या डब्यात असणाऱ्या महिलेकडे पाहून काही अश्लील चाळे केले होते. हा प्रकार कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान चालत्या लोकलमध्ये घडला होता.

त्यानंतर महिलेनं थेट रेल्वे पोलस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर दादर रेल्वे पोलस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकानं विविध स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंतर आरोपीला घाटकोपर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने अटक केली. राहुल किसन जगधने असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT