Mumbai Local Train Google
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवरील लोकलचं वेळापत्रक पुन्हा विस्कटलं! माटुंगाजवळ रेल्वे रुळाला तडा, ट्रेन उशिरानं

Central Railway Matunga : मुंबईतील सेंट्रल लोकल सेवा विस्कळीत झालीय. माटुंगा स्थानकाजवळील रेल्वे रुळाला तडे गेले आहेत.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मध्य रेल्वेवरील लोकलने संध्याकाळी घरी परतणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. डाउन धीम्या मार्गावरील रुळाला तडा गेल्यानं लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळं लोकल उशिराने धावत आहेत. अशीच परिस्थिती संध्याकाळपर्यंत राहिली तर, ऑफिसवरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धीम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आलीय. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धीम्या मार्गावरील लोकल सेवा ७ मिनिटे उशिराने धावत आहे.

कल्याण धीम्या लोकल लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं होतं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचे समोर आलं होतं. दुपारी १.४० वाजेपर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ७ ते १० मिनिट उशिराने सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू होत्या. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यात रुळाला तडे गेले असल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली. दरम्यान पावसामुळे ठाणे, दादर, कल्याण आणि कुर्ला रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली.

अगदी आठवडाभरापूर्वी मुंबईत सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईतील जीवनवाहिनी काही काळापुरते ठप्प झाली होती. या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT