Mumbai Local train Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

Mumbai Local Train Mega Block : मध्य रेल्वेच्या ६३ तासांच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प झाले असून शुक्रवारी पहाटेपासून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Satish Daud

प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही मध्य रेल्वेने तब्बल ६३ जम्बो ब्लॉक घेतला. गुरुवारी मध्यरात्रीपासून या ब्लॉकला सुरुवात झाली. ब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. शुक्रवारी पहाटे कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

अनेकांना या मेगाब्लॉकची कल्पना नसून घरी जायचे तरी कसे? या संदर्भातला संभ्रम लोकांच्या मनात दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या वतीने आज गुरुवारपासून ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ अणि ६ चे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम देखील केले जाणार आहे.

यासाठी मध्य रेल्वेने तब्बल ६३ तासांचा ब्लॉक घेतला आहे. मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे ३ दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेवरील ब्लॉक सुरू होताच ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी ताटकळले असून संताप व्यक्त केला जात आहे. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी स्थानकावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे देखील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, प्रवाशांनी संयम बाळगून बसने किंवा टॅक्सीने प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून बेस्ट बसच्या जादा बसेस चालविण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT