Mumbai Local: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबई हादरली! लोकलच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, घाटकोपर -विक्रोळी स्थानकादरम्यानची घटना

Mumbai Local Accident: मुंबईत सोमवारी लोकलच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Priya More
  • मुंबईत लोकलच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू

  • भांडूप रेल्वे स्थानकाजवळ एसी लोकलच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

  • घाटकोपर-विक्रोळी स्थानकादरम्यान रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी खोळंबा झाला होता. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. लोकलसेवा ९ तासांपासून अधिक काळ विस्कळीत राहिली. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अशात रेल्वे रूळावरून चालत जाणाऱ्या प्रवाशांना लोकलने धडक दिली. या दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडूप रेल्वे स्थानकाजवळ एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. साहिल थिटे असं या मृत तरुणाचे नाव होते. तर दुसरी घटना घाटकोपर-विक्रोळी स्थानकादरम्यान घडली. लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. लोकल उशिरा असल्यामुळे रेल्वे रुळावरून हे प्रवासी चालत जात होते. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तर जखमींवर देखील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना तिथे दुसरा मृतदेह देखील आढळला. या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भांडूप येथे मृत्यू झालेला राहुल थिटे हा मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहत होता. तो भांडूप येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. घाटकोपर-विक्रोळीदरम्यान आढळलेले मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात; 14 टेबलवर मोजणी

Food Safety : तोंडाला पाणी आणणारी मिठाई जीवावर बेतू शकते, चांदीच्या वर्कच्या नावाखाली पोटात जातंय विष; जाणून घ्या कसं ओळखाचं

Maharashtra News Live Update: गोकुळ अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांची महायुतीच्या नेत्यांना साद

Tuesday Horoscope: 5 राशींना मिळणार खुशखबर! येत्या काळात मोठी संधी मिळणार; वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Madhuri Dixit: सोनेरी साडी अन् नाजूक टिकली; माधुरी दीक्षितचा गोल्डन साडीतील मनमोहक शाही अंदाज

SCROLL FOR NEXT