मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Train Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्जत स्टेशनवर ओएचई व अभियांत्रिकी कामांसाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत यार्ड सुधारणा प्रकल्पांतर्गत महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) लाईनचे काम आणि अभियांत्रिकी दुरुस्तीची कामे होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत स्टेशन परिसरात ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक लागू करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कर्जत आणि खोपोली मार्गावरील काही उपनगरी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही गाड्या रद्द राहणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, हे ब्लॉक सलग चार दिवस घेण्यात येणार असून त्यात काही गाड्या रद्द राहतील तर काही गाड्यांचे टर्मिनेशन/ओरिजिनेशन कर्जत येथेच होईल. CSMT वरून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल – ही गाडी कर्जत येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. कर्जत–खोपोली दरम्यान ही गाडी रद्द राहील. खोपोलीवरून १६.३० वाजता सुटणारी CSMT लोकल – ही गाडी खोपोलीवरून न सुटता कर्जतवरून शॉर्ट ओरिजनेट होईल. ही गाडी कर्जतवरून १६.५७ वाजता सुटेल. खोपोली–कर्जत दरम्यान ही गाडी रद्द राहील.

पहिला ब्लॉक : शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५

कालावधी: दुपारी १४.३० ते १६.३० (एकूण २ तास)

कामाचा विभाग: अप मार्गावर – कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) ते नागनाथ केबिन (क्रॉसओव्हर वगळून)

गाड्यांवरील परिणाम:

कर्जतवरून १५.३९ वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द

खोपोलीवरून १४.५५ वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द

दुसरा ब्लॉक : रविवार, ०७ सप्टेंबर ते मंगळवार, ०९ सप्टेंबर २०२५

कालावधी: दुपारी १४.३० ते १७.०० (एकूण २ तास ३० मिनिटे)

कामाचा विभाग: अप मार्गावर – कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) ते नागनाथ केबिन (क्रॉसओव्हर वगळून)

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या ब्लॉक काळात प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना गाड्यांमधील बदलांचा विचार करावा. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT