Mumbai Marathon Special Trains Schedule and Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Special Trains : येत्या रविवारी मुंबईत दोन विशेष ट्रेन धावणार, मॅरेथॉनसाठी खास सोय, कसं आहे वेळापत्रक? वाचा

Mumbai Marathon Special Train Update : रविवारी (१९ जानेवारी) मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनमधील स्पर्धकांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवणार आहे.

Yash Shirke

Mumbai Local Special Trains Updates : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ च्या निमित्ताने रेल्वेच्या वतीने मुंबईत विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होता यावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रविवारी (१९ जानेवारी) मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विशेष उपनगरीय लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

रविवारी म्हणजे १९ जानेवारीला मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या मॅरेथॉनमध्ये अनेकजण सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षीही असंख्य मुंबईकरांनी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी नोंदणी केली आहे. तेव्हा सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना मॅरेथॉनसाठी वेळेवर पोहोचला यावे यासाठी रेल्वेने २ विशेष लोकल गाड्या चालवण्याचे ठरवले आहे.

लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -

१. मध्य रेल्वे लाईन : कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन कल्याणहून पहाटे ०३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ०४.३० वाजता पोहोचेल.

२. हार्बर लाईन : पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

विशेष ट्रेन पनवेलहून पहाटे ०३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ०४.३० वाजता पोहोचेल.

या दोन्ही विशेष लोकल गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. स्पर्धकांसह सामान्य प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज (१५ जानेवारी) रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल ट्रेनसंबंधित पत्रक प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT