Mumbai Local Railway 
मुंबई/पुणे

Mega Block: मुंबई लोकल रेल्वेचा मेगा ब्लॉक; मध्य, हार्बर लाईनवरील वाहतूक सेवा राहणार बंद

Mumbai Local Railway: रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक कसा असेल? कोणत्या ठिकाणापर्यंत हा रेल्वे सेवा वाहतूक बंद राहणार? किती वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल याची माहिती जाणून घेऊ.

Bharat Jadhav

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर थांबा. कारण मुंबईतील मध्य आणि हार्बर लाईन्सवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक कसा असेल? कोणत्या ठिकाणापर्यंत हा रेल्वे सेवा वाहतूक बंद राहणार? किती वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल याची माहिती जाणून घेऊ. माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल -कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष सेवा

ब्लॉक कालावधीत पनवेल -कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशन वरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा विशेष ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक असणार आहे. येत्या ८ मार्च म्हणजे शनिवार आणि ९ मार्च म्हणजे रविवार रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये लोकल प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं, असे आवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर पहिला ब्लॉक शनिवारी ८ मार्चला सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असणार आहे. दुसरा आणि तिसरा ब्लॉक ९ मार्च म्हणजे रविवार सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत आणि दुपारी ४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.२५ वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर घेण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT